प्रेम

दोन भाऊ असतात.

त्यांचे एकमेकांवर खुप प्रेम असते..


त्यांची शेती ही एकमेकांना लागुन होती..


मोठ्या भावाचं लग्न झालेलं असतं
तर
छोटा अविवाहित असतो..
:
;


एकदा शेतात खुप चांगले पिक येते.. चांगले धान्य पिकते..
:
शेतातील काम करत असताना दुपारच्या वेळी लहान भावाला शेतावर लक्ष ठेवायला सांगुन मोठा भाऊ जेवण करायला घरी जातो..

तो घरी गेल्यावर लहान भाऊ विचार करत बसतो..
यंदा शेत चांगले पिकले आहे धान्य उत्पादन भरपूर झाले आहे..


मी तर एकटाच आहे दादाचे कुटुंब आहे,.. वहिनी, दोन मुलं आहेत.. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला धान्य जास्त लागते…
.
मी तर एकटाच आहे मला धान्य कमी लागते व माझा खर्चही कमीच आहे..


:
असा विचार करून तो लहान भाऊ १० पोती धान्य मोठ्या भावाच्या धान्यात टाकतो….
.
.
.
थोड्यावेळात मोठा भाऊ जेवण करुन येतो..


:
तो आल्यानंतर लहान भाऊ जेवण करायला घरी जातो..


:
तो गेल्यावर मोठा भाऊ दोन्ही धान्याच्या राशीकडे ( ढिग ) पाहुन विचार करतो, माझे तर लग्न झाले आहे प्रपंच चांगला चालु आहे ….


:
छोट्याचे तर लग्न व्हायचे आहे, संसार चालु व्हायचा आहे . त्याला जबाबदारी सांभाळायची आहे
मी एवढे धान्य ठेऊन काय करु…
:
तो विचार करुन १० पोती धान्य लहान भावाच्या धान्यात टाकतो….
:
दोन्ही भावांच्या मनात प्रसन्नता होती, समाधान होतं …


धान्य होतं तेवढंच होतं पण भावांभावातील प्रेम, सहकार्य, विश्वास मात्र वाढत होता…
:


विचार व कृती चांगली असेल तर प्रेम ही वृद्धिंगत होतंच ………..


तात्पर्य = अशा प्रकारे भाऊ भाऊ विचार व कृती करत राहिले तर जगातील कोणतीही ताकत अशा कुटुंबाला वेगळं करु शकत नाही..

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top
Send this to a friend