Milk Adultration Test (दुधातील भेसळ ओळखणाय्रा परीक्षा)

दुधातील भेसळ ओळखणाय्रा परीक्षा(Milk Adultration Test) :

साखर भेसळ परीक्षा : दोन पद्धत

पद्धत क्र 1

1) एका परीक्षानळीत 15 मि.ली. दूध घेणे

2) त्यामध्ये 1 मि.ली. तीव्र हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकणे

3) पुन्हा त्यामध्ये 0.1 ग्रॅम रिसोर्सिनल पावडर मिसळणे

4) परीक्षा नळीतील मिश्रण चांगले मिसळून 100 C° पाण्यामध्ये 5 मिनीटे ठेवा.

5) 5 मिनीटानंतर मिश्रणाला रंग लाल किंवा तांबडा आल्यास परीक्षा होकारार्थी समजावी

  पद्धत क्र 2

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) त्यामध्ये 5 मि.ली. तीव्र हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि रिसोर्सिनल पावडर चे तयार केलेले संपृक्त द्रावण मिसळावे

3) परीक्षा नळीतील मिश्रण चांगले मिसळून 100 C° पाण्यामध्ये 5 मिनीटे ठेवा.

5) 5 मिनीटानंतर मिश्रणाला रंग लाल किंवा तांबडा आल्यास परीक्षा होकारार्थी समजावी

(टीप :दुधात नैसर्गिक लॅक्टोज म्हणजे एक प्रकारची साखर असते 

ही साखर परीक्षा 100 °C पेक्षा जास्त अनियंत्रित तापमानास केल्यास परीणामी तांबडा रंग दाखवु शकतो .

ईलेक्ट्रीक शेगडी किंवा ईतर स्टोव्ह वर उकळत्या पाण्यात ही तपासणी करताना तापमानावर नियंत्रण न राहिल्यास तांबडा कलर येवु शकतो त्यामुळे योग्य परिणाम मिळेल याची खात्री नसते.

शक्य झाल्यास साखर भेसळ तपासणी waterbath मध्ये 100 C° तापमान नियंत्रित ठेवुन करावी अचुक परीणाम मिळतो .)

स्टार्च भेसळ परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) त्यातील दूध उकळून पुन्हा थंड करणे

3) त्यामध्ये (1ः) आयोडिन द्रावणाचे 2 थेंब मिसळा

4) निळा रंग आल्यास परीक्षा होकारार्थी समजावी

मिठ भेसळ परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. सिल्वर नायट्रेट घेणे

2) त्यामध्ये दोन थेंब पोटॅाियम डायक्रोमेट टाका

3) त्यामध्ये 1 मि.ली. दूध मिसळा

4) 2 मिनिटानंतर त्या परीक्षा नळीतील मिश्रणाचा रंग पिवळा आल्यास मीठ परीक्षा होकारार्थी समजावी अन्यथा तपकिरी रंग आल्यास नकारार्थी समजावी.

सोडा परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) त्यामध्ये 5 मि.ली. अॅब्सुल्यूट अल्कोहोल (99.99ः) मिसळणे

3) त्यामध्ये रोझालिक अॅसिड (1ः) चे 5 थेंब मिसळणे

4) हे द्रावण चांगले मिसळल्यानंतर गुलाबी रंग आल्यास सोडा परीक्षा होकारार्थी समजावी

अल्कोहोल भेसळ परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) त्यामध्ये 5 मि.ली. अल्कोहोल (70ः 68ः 65ः) मिसळणे

3) परीक्षा नळीत दुधाचे क्लाॅटस् (गाठी) आढळल्यास सदर परीक्षा होकारार्थी समजावी

युरीया भेसळ परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) त्यामध्ये 5 मि.ली. डि.एम.अे.बी. मिसळणे

3) परीक्षा नळीत गडद निळा पिवळा रंग आढळल्यास सदर परीक्षा होकारार्थी समजावी

उकळी भेसळ परीक्षा :

1) एका परीक्षानळीत 5 मि.ली. दूध घेणे

2) सदर परिक्षानळी 5 मिनिट उकळत्या पाण्यात ठेवणे

3) सदर परिक्षानळीचे निरिक्षण करणे, दुधाचे कण परिक्षानळीवर चिकटलेले अथवा व दूध फाटलेले आढळले तर उकळी परिक्षा होकारार्थी समजावी.

ग्लुकोज भेसळ परिक्षा :

1) दुधाचा नमुना घेऊन त्यामध्ये ग्लुकोज स्ट्रिप 2 सेकंद

बुडवणे.

2) ग्लुकोज स्ट्रिपवरील जास्त असलेले दूध झटकणे व 30 सेकंद निरीक्षण करणे

3) 30 सेकंदामध्ये ग्लुकोज स्ट्रिपच्या रंगामध्ये बदल झाल्यास परिक्षा होकारार्थी समजावी, बदल झालेला रंग ग्लुकोज स्ट्रिपच्या बाॅक्सवरील कलर बरोबर तुलना करून पहावी.

1.माल्टोज भेसळ डेक्स्ट्रीन परिक्षा:

1) परिक्षानळीत 15 मि.ली. दूध घेणे.

2) त्यामध्ये 1 मि.ली. लॅक्टीक/सायट्रीक अॅसिड मिसळणे

3) ही परीक्षानळी 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवणे

4) दूध व दुधाचे पाणी विभक्त झाले का नाही ते पहाणे

5) सदर परिक्षा नळीतील दूध फिल्टर पेपर किंवा पेपर गाळण कापडाने 5 मि.ली. गाळूण घेणे.

6) सदर परिक्षा नळी थंड करून घेणे

7) सदर द्रावणाचा कलर फिकट पिवळसर राहिला तर नकारार्थी समजावी व डार्क ब्राऊन /इतर कलर आला तर परिक्षा होकारार्थी समजावी.

2. माल्टोज डेक्स्ट्रीन भेसळ परिक्षा :

1) 100 मि.ली. काचेच्या पात्रात 20 मि.ली. दूध घेणे.

त्यामध्ये 1 मि.ली. लॅक्टीक अॅसिड टाकणे

2) त्यामध्ये 1 मि.ली. एन्झाइम् सोल्यूान टाकणे व सदर काचेचे पात्र 5 मिनीट 650से. ला पाण्यात ठेवणे.

3) डायेस्टिक स्ट्रीपला दुधात बुडवणे व स्ट्रिपच्या बाॅक्सवरील कलर बरोबर तुलना करून पहावी.

4) ; ;; 5ः 10ः असल्यास पाॅझिटीव्ह असते व ते होकारार्थी समजावे.

अमोनिया बेस साल्ट भेसळ परिक्षा :

1) पिपेटच्या साह्यााने 3 मि. लि. दूध परिक्षा नळीत घेणे.

तत्पुर्वी टाकीतील दुधाचे चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेला नमुना काढणे.

2) सदर परीक्षा नळी 270 सेे. ला गरम करणे.

3) त्यानंतर त्यामध्ये 3 ते 5 थेंब नेस्लर रिअेजंट चे टाकणे व ताबडतोब सदर मिश्रणाच्या रंगातील बदलाची तपासणी करणे.

4) सदर परीक्षा नळीतील मिश्रणाचा रंग ताबडतोब बदलल्यास दुधाच्या नैसर्गिक रंगाकडून पिवळ्याा रंगाकडे झुकल्यास किंवा फिक्कट विटकरी किंवा विटकरी आल्यास परीक्षा होकारार्थी समजावी व दुधाचा रंग न बदलल्यास परीक्षा नकारार्थी समजावी.

5) सदर परीक्षा करताना घ्यावयाची काळजी: दुधाचा नमुना योग्य रितीने ढवळून घ्यावा व नेस्लर रिअेजंटचे थेंब टाकल्यानंतर लगेच रंगातील बदल पाहणे.

दुधाची एम. बी. आर टी. परीक्षा( Milk M.B.R.T)

  • एम. बी. आर टी म्हणजे मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट होय. दूध सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम खाद्य आहे. दूध हे सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्ट्या पिण्यासाठी किंवा प्रक्रियेसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी ही चाचणी केली जाते.
  • या चाचणीसाठी मिथिलीन ब्लू नावाचे, निळसर रंगाचे द्रावण वापरले जाते. हे द्रावण दुधात टाकल्यानंतर दुधाचा रंग निळसर होतो.
  • दुधामध्ये जर जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव असतील तर हे जिवाणू हा रंग लवकर नाहीसा करतात. त्यामुळे या दुधाचे रंगहीन होण्याचे प्रमाण व वेळ हे सूक्ष्मजीवाच्या संख्येवर अवलंबून असतात.

चाचणी

  • एका निर्जंतुक परीक्षानळीत १० मिली दूध घ्यावे. त्यामध्ये १ मिली एमबीआर चे द्रावण मिसळावे.
  • ते द्रावण योग्यरीत्या मिसळून ही परीक्षानळी ३७ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवावी.
  • दर अर्ध्या तासांनी परीक्षानळीचे निरीक्षण करावे.
  • निळा रंग नाहीसा (संपूर्ण) होण्याची वेळ नोंद करावी.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top
Send this to a friend