दुध संकलन केंद्राचे उत्पादकांसाठीचे दुधअनुदान सूचनापत्र

विषय :- शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु. 5/- अनुदान प्राप्त करण्यासाठी दुध उत्पादकांची वैयक्तीक माहीती सादर करणेबाबत.

महोदय,

वरील विषयास अनुसरुन आपणा सर्वांना कळविणेत येते को, शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु.5/– अनुदान सहकारी संघासमवेत खाजगी प्रकल्पांना सुद्धा देणेबाबत शासन निर्णयात निर्देशित केलेले आहे.

शासन अनुदानाचा लाभ थेट आपल्या बैंक खाती वर्ग होणे करीता खालील प्रमाणे माहीती त्वरीत दूध संकलन केंद्रावर सादर करण्यात यावी. तसेच पशुधन Ear Tagging करणे करिता नजिकच्या पशुधन वैद्यकिय अधिकारी यांच्या संपर्क करुन Ear Tagging करून घेण्यात यावी व त्याची नोंद खालील नमुन्यात नमुद करुन

दुध संकलन केंद्रास सादर करावी.

दूध उत्पादक शेतक-याचे नाव संपूर्ण पत्ता संस्थेस दूध पुरवठा बँकेचे नाव व शाखा बँक खाते क्रमांक आय.एफ.एस.सी. कोड आधारकार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक दुध उत्पादन पशुधन संख्या Ear Tagging क्रमांक तपशील

सोबत :- 1. बैंक पासबुक / धनादेश छायांकित प्रत

2. आधारकार्ड छायांकित प्रत ,दूध उत्पादक शेतक-याचो स्वाक्षरी

वरील योजानेचा लाभ घेणे करीता खालील अटी व शर्ती सर्व दूध उत्पादक शेतक-यांना बंधनकारक राहील.

१. जे दुध उत्पादक शेतकरी दुध पुरवठा पेमेंट बैंक खाती वर्ग करण्यास संमती देतील त्याच दुध उत्पादक
शेतक-यांना शासन अनुदानाचा लाभ मिळेल याची नोंद घ्यावी.

२. दुध संकलन केंद्रास दूध पुरवठा केलेल्या दुधाचे पेमेंट वर नमूद असलेल्या बँक खाती वर्ग करणे
बंधनकारक राहील.

३.कोणत्याही दुध उत्पादक शेतक-यांच्या मोबाईल फोन पे व गुगल पे, अथवा पे.टी.एम. बर दूध पेमेंट अदायगी होणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

४. सर्व दुध उत्पादक शेतक-यांनी शासनाने निर्धारीत केलेली गुणप्रत किमान फॅट 3.2 व एस.एन.एफ. 8.3
वरिल गुणप्रतीच्या दुधाचा पुरवठा बंधनकारक राहील. दसवाड़ा दूध पुरवठा मध्ये एक दिवसजरी शासनाने निर्धारीत केलेली गुणप्रत किमान फॅट 3.2 व एस.एन.एफ. 8.3 पेक्षा कमी गुणप्रतीच्या दुधाचा पुरवठा दूध संकलन केंद्रास केल्यास दसवाडा अनुदान रक्कम देय राहणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
५.दसवाडा दूध पुरवठा बिले आपल्या दप्तरी ठेवण्याची जबाबदारी दूध उत्पादक शेतक-याची

वरिल सर्व अटी व शर्तीची नोंद घेऊन सत्य माहिती दूध संकलन केंद्रास अवगत करावी कोणतीही चुकीची माहिती आढळून आल्यास दुध संकलन केंद्र यास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच सदर अनुदान हे शासन थेट दूध उत्पादक शेतक-यांच्या बैंक खाती वर्ग करणार असून यास दुध संकलन केंद्राचा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध राहणार नाही याची नोंद घेऊन दुध संकलन केंद्रास दुध पुरवठा करण्यात यावा हि विनंती.

शासन स्थरावरुन येणाऱ्या सुचना आवश्यकते नुसार आपणांस वेळोवेळी कळवण्यात येतील

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top
Send this to a friend